सतत वर्तमान स्थितीत रहाणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे !

चैत्र कृष्ण पक्ष नवमी, म्हणजे ५.५.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे यांचावाढदिवस आहे. त्या निमित्ताने सहसाधिका कु. अमृता मुद्गल हिला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. मयुरी आगावणे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 

कु. मयुरी आगावणे

१. इतरांना साहाय्य करणे

​‘मयुरीमुळे मला सकाळी नियोजित वेळेत ‘उठणे, अल्पाहार करणे, औषधे घेणे, नामजपादी उपाय करणे’, अशाचांगल्या सवयी लागल्या. ती माझ्या चुका सांगून मला साधनेत साहाय्य करते.

२. वर्तमान स्थितीत रहाणे

कु. अमृता मुद्गल

अ. तिने मला तिच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. त्या वेळी ‘तिने किती खडतर जीवन जगले आहे’, हे मला समजले; पण यापूर्वी कधीच तिच्या वागण्या-बोलण्यावरून त्याविषयी कळले नव्हते.

आ. घरच्या कठीण परिस्थितीमुळे तिला त्रास झाला, तरी तिच्या सेवेवर त्याचा परिणाम होत नाही.

३. भाव

अ. कु. मयुरीताईचा आवाज अतिशय कोमल आणि सुमधुर आहे. तिने गायलेले भजन ऐकतांना भावजागृती होते आणि आनंदजाणवतो.

आ. मला भावजागृतीसाठी सुचलेले काही प्रयत्न मी तिला सांगते. तेव्हा ती शब्दन् शब्द लिहून घेते आणि तसे प्रयत्न करते.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे

​ स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत सारणीत चुका लिहिणे, स्वयंसूचना सत्र करणे आणि नामजपादी उपाय करणे, हेसर्व ती गांभीर्याने अन् नियमित करते आणि त्यातून आनंद घेते. तिच्यामध्ये भक्तीभाव, तळमळ, कृतज्ञताभाव आदी बरेच गुणआहेत.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

​ ‘देवाने तिच्या माध्यमातून मला बरेच काही शिकवले’, या जाणिवेने मला तिच्याप्रती अतिशय कृतज्ञता वाटते. अशागोड आणि प्रेमळ मयुरीताईला वाढदिवसानिमित्त माझा नमस्कार ! ‘तिची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊ दे’, अशीभगवान श्रीकृष्णाच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– कु. अमृता मुद्गल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२१)