श्री. सागर निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा !

चैत्र शुक्ल पक्ष एकादशी (२३.४.२०२१) या तिथीला श्री. सागर निंबाळकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांनी केलेली कविता आणि दिलेल्या शुभेच्छा, तसेच अन्य कविता येथे देत आहोत.

श्री. सागर निंबाळकर

गुरूंच्या कृपेने मिळाली शब्दब्रह्माची सेवा

सदा यांच्या जिव्हेवर नांदे काव्यमय शब्दसुमनांचा ठेवा ।
म्हणूनच तर साधनेसाठी गुरूंनी दिली शब्दब्रह्माची सेवा ॥ १ ॥

न हे केवळ कौशल्य तुमचे, ही आहे माता सरस्वतीची कृपादृष्टी ।
तुम्ही रचलेली बिरुदावली ऐकतांना झाली होती आम्हास ही निश्‍चिती ॥ २ ॥

गुण सांगावे तर जाणवे तुमच्यात क्षात्रतेज आणि धर्मप्रीती ।
इतरांना हसवण्याची आणि सतत प्रोत्साहित
करण्याची वृत्ती ॥ ३ ॥

संतांचे मिळते मार्गदर्शन तुम्हासी सदोदित ।
चला तर, साधना अन् श्रद्धा वाढवून करा आम्हा आनंदित ॥ ४ ॥

प्रार्थना आहे आजच्या शुभदिनी त्या कोमल चरणांसी ।
करूनी फेर्‍यांतूनी मुक्तता द्यावे स्थान महर्लोकासी ॥ ५ ॥

श्री. सागरदादा यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा !

– कु. हर्षदा दातेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. सागर निंबाळकर यांनी साधकांसाठी केलेली कविता

साधनेत येण्यापूर्वी, कुठली जन्मतिथी आणि कुठला वाढदिवस ।
तो होता एक दिनांक आणि अगदी सर्वसामान्य दिवस ॥ १ ॥

सनातनमध्ये आल्यानंतर वाढदिवशी
मला ‘महनीय व्यक्ती’ असल्यासारखं वाटतंय ।
परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांच्या प्रीतीमुळे
कृतज्ञतेने कंठ दाटतोय ॥ २ ॥

सनातनमुळेच मनुष्यजन्माचे मोल कळले ।
परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच देवाचे बोल कळले ॥ ३ ॥

आता मागणे एकचि गुरुदेवा, तव चरणांचा विसर न व्हावा ।
तुम्ही अंगीकारलेल्या धर्मसंस्थापनेसाठी,
हा देह अखंड झिजत रहावा ॥ ४ ॥

रामनाथी आश्रमात सद्गुरु, संत, साधक यांच्या समवेत आणि साक्षात् आपल्या चरणी सेवा दिल्याविषयी कोटीशः कृतज्ञता ।
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२१)

पू. संदीप आळशी

रामनाथी आश्रमातील साधक श्री. सागर निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

​कोणत्याही सेवेसी सदा तत्पर,
​भावस्पर्शी लिखाण-बहाद्दर,
​शिकण्याचा ध्यास निरंतर,
​राष्ट्र-धर्म कार्याकरिता बद्धपरिकर,

​अशा गुरुसेवक सागरास करुणासागर गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टरांचे अनेकानेक शुभाशीर्वाद ! समस्त गुरुसेवक आणि सनातन परिवार यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि भरभरून प्रेम !

– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.