‘अश्‍लील सीडी’च्या सर्व घडामोडींकडे लक्ष ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक

बेळगाव – ‘अश्‍लील सीडी’च्या सर्व घडामोडींकडे लक्ष असून या प्रकरणाची क्षणाक्षणाची माहिती घेत आहे. या प्रकरणी अन्वेषण योग्य प्रकारे चालू असून कायदामंत्री आणि गृहमंत्री पूर्ण दायित्व घेऊन काम करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून काय करायला हवे, ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. ‘विशेष अन्वेषण पथक’ अन्वेषण योग्य प्रकारे करत नाही, ही समजूत चुकीची असून १०० टक्के योग्य प्रकारे अन्वेषण चालू आहे, असे मत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार मंगला अंगडी यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा ३० मार्च या दिवशी बेळगाव येथे आले होते. त्या वेळी सीडी प्रकरणी पहिल्यांदाच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.