छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भरतखंडातील मराठ्यांना मिळालेला पराक्रम आणि सुव्यवस्थेचा अमूल्य वारसा !

‘भरतखंडात इतरांना न मिळालेला असा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठ्यांना मिळालेला आहे. आपल्या पूर्वजांनी अजून न विसरल्या गेलेल्या काळात शेकडो लढाया लढल्या आहेत. मोठी सैन्ये घेऊन देशाच्या सीमेवर जाऊन आपले खंड परक्यांच्या आक्रमणापासून राखण्याचा अटीतटीचा सामना ते खेळले आहेत. त्यांनी स्वतंत्र राज्येही चालवली आहेत. महसूल आणि व्यय (खर्च) यांचा कोट्यवधी रकमांचा व्यवहार आपण हाताळला आहे. साम्राज्याचे प्रश्‍न सोडवण्याचा त्यांनी स्वत: प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मरक्षणासाठी त्यागही केले आहेत. असे या खंडातील दुसर्‍या कोणत्या लोकाविषयी म्हणता येण्यासारखे आहे

–  श्री. शेजवलकर (संदर्भ : ‘श्री शिव छत्रपति’, पृ. ५८)