पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणार्‍यांची हयगय केली जाणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई – मुंबई पोलिसांची स्थानांतरे कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलेली  नाहीत. पोलिसांच्या स्थानांतराविषयी करण्यात आलेल्या आरोपांविषयी पूर्ण माहिती घेऊनच मी बोलीन. पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणार्‍यांची हयगय केली जाणार नाही, असे वक्तव्य २५ मार्च या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी केले. या वेळी अजित पवार म्हणाले, ‘‘गृहमंत्र्यांवरील आरोपाविषयी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहकार्‍यांशी चर्चा झाली. याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.’’