१. तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. तांदळाचे दूध, दही, ताक किंवा आमटी यांत घालून खाता येते. पीठ दुधातून घेतल्यास त्यात चवीसाठी साखर किंवा गूळ घालू शकतो. गहू किंवा नाचणीच्या पिठाची तिखट किंवा गोड पेज बनवता येते. भाकरी किंवा अंबिल बनवता येते. तांदुळाच्या पिठाचे घावन, उकट इ. पदार्थ बनवता येतात. सातूचे पीठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी गहू न वापरता जव वापरतात, तर काही ठिकाणी केवळ अख्खे हरभरे भाजून त्याचे पीठ करतात. ५ ते ७ धान्ये एकत्र करून भाजून त्याचेही पीठ करता येते.
२. यंत्राद्वारे प्रक्रिया केलेले पौष्टिक पदार्थ : दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.