देवीमुखातून ऐकली देवीमातेची स्तुती, जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली ।

‘१७ ते २५.१०.२०२० या कालावधीत नवरात्रीनिमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेले भाववृद्धी सत्संग ऐकून मला कविता सुचली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्री. संजय घाटगे

देवीमुखातून (टीप १) ऐकली देवीमातेची स्तुती ।
जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली ॥ धृ ॥

मधुर वाणी, मधुर स्वर, ।
करता श्रवण देवीमुखातून एकाग्रतेने ।
भावसमाधी लागली ।
जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली ॥ १ ॥

आवाजातील मधुर मार्दव ।
देई देवीतत्त्वाची प्रचीती ।
माते तुझ्या मुखात आहे ।
सर्वांमधील वात्सल्यभाव आणि ममत्व
जागृत करण्याची शक्ती ॥ २ ॥

कथा सांगण्यामध्ये सद्गुरु माऊली तू एवढी गुंगून जातेस ।
ज्या देवतेची कथा सांगतेस,
तिच्यामध्ये पूर्णपणे सामावून जातेस ॥ ३ ॥

ऐकणार्‍याला देवी स्वतःच तिची कथा, स्तुती सांगते ।
असे बंद नेत्रापुढे दृश्य भासमान होते ।
ऐकणारा तुझा भक्त डोळे मिटून, कान एकाग्र करून ।
एकचित्ताने देवीची कथा श्रवण करत असतो ॥ ४ ॥

तेव्हा पुनःपुन्हा सांगावेसे वाटते ।
देवीमुखातून देवी मातेची स्तुती ऐकली ।
जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली’ ॥ ५॥

टीप १- श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२२.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक