‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आपण ऐकत असलेला भावसत्संग ही भावपूजाच असते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि अन्य साधिका भावसत्संगात जी सूत्रे सांगतात, ती भावपुष्पे असतात. या सत्संगात सांगितलेली सूत्रे लिहिणे, म्हणजे भावपुष्पांची रचना करण्यासारखेच आहे. सूत्रे लिहितांना ‘मी पुष्परचनाच करत आहे’, असा भाव ठेवावा. या भावसत्संगातील सूत्रे अन्य सत्संगात सांगण्यासाठीही उपयुक्त असतात.’
– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र (१९.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |