१. ‘ऑनलाईन’ सत्संगात सांगितल्यानुसार नामजप केल्यामुळे त्यातील शक्तीची जाणीव होणे : ‘जेव्हापासून नामजपाचे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले आणि ते ऐकून नामजपाला आरंभ केला, तेव्हापासून नामजपातील शक्तीची मला जाणीव झाली. या सत्संगामुळे घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे. आतापर्यंत आम्ही या नामशक्तीपासून दूर होतो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधनेचे ज्ञान सत्संगातून मिळाल्यामुळे प्रथमच गुरुपौर्णिमा सोहळ्याला उपस्थित रहाता येणे : सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगातून हे ज्ञान दळणवळण बंदीच्या काळात मला मिळाले. याची माहिती तातडीने मी माझ्या बहिणीला कळवली. सत्संगात मिळालेल्या या ज्ञानामुळे मला प्रथमच गुरुपौर्णिमा सोहळ्याला उपस्थित रहाता आले. ‘हे ज्ञान मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मिळाले’, यासाठी मी कृतज्ञ आहे.’
– सौ. वर्षा रामचंद्र ठाकरे, साईनगर, यवतमाळ. (नोव्हेंबर २०२०)