१. ‘रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीयंत्राची पूजा करत होत्या. तेव्हा मला श्रीयंत्राचा खालचा भाग कमळासारखा दिसत होता आणि वरचा आकार विशाल मंदिराच्या आतील परिसरासारखा दिसत होता, तसेच श्रीयंत्रावर देवीचे मुख, दोन डोळे आणि त्यावर सुंदर मुकूट असल्यासारखे दिसत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या देवीवर करत असलेला अभिषेक पूर्ण झाला आणि त्या पात्रात असलेले जल वारा नसतांनाही समुद्राच्या पाण्यासारखे हलत असतांना दिसत होते.
३. ‘हा विधी पाहून सर्व देवीदेवता प्रसन्न झाल्या आहेत’, असे वाटत होते.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भांगात बिंदी घातली आहे’, असे लांबून दिसत होते. त्यामुळे ‘देवीतत्त्व जागृत झाल्यामुळे देवीमाता प्रसन्न झाली आहे’, असे वाटत होते.
देवीने दिलेल्या अनुभूती अनुभवतांना मन आनंदी होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. मिथिलेश कुमारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |