‘निर्गुण’ हा नामजप करतांना मन निर्विचार होऊन हवेत तरंगत असल्याचे जाणवणे

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा जप करतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी जप करत असलेल्या ठिकाणी एक नदी असून त्या नदीमधील पाणी स्वच्छ आणि निर्मळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. मी मांडी घालून मुद्रा करून नामजप करत असतांना माझे मन निर्विचार झाले. अशा निसर्गरम्य वातावरणात ‘मी हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवले. मला मधूनच अष्टगंधाचा सुगंध येऊन आनंद होत होता.

‘गुरुदेवांनी ही अनुभूती दिली’, त्याविषयी मी गुरुदेव आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती सुनिता सोसे, नाशिक (१२.७.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक