ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना दोन्ही तळपायांतून फिकट निळसर प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे

‘२९.७.२०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा ‘मला झोप लागली होती का ?’, ते मला आठवत नाही; परंतु माझे डोळे उघडे असल्याचे मला जाणवत होते. ‘मी माझ्या पावलांकडे पहात आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी माझ्या दोन्ही तळपायांतून अनुमाने चार ते सहा इंचांपर्यंत फिकट निळा प्रकाश प्रक्षेपित होतांना मला दिसत होता.

‘भगवंताने मला ही अनुभूती देऊन माझ्यावर अनंत कृपा केली’, त्याविषयी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रवीण नारखेडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक