गुरुराया, तुमचे चरण किती महान असती ।

श्री. देवदत्त व्हनमारे

गुरुराया, तुमचे चरण किती महान असती ।

एक स्मरणाने सर्व त्रासदायक आवरण नष्ट होई ॥ १ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती महान असती ।

चरणामध्ये अवघे विश्‍व विराजमान होई ॥ २ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती सुंदर असती ।

चरणांच्या एक स्मरणाने मन आनंदी होई ॥ ३ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती कोमल असती ।

एका स्मरणाने परम शांती अनुभवता येई ॥ ४ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती प्रीतीमय असती ।

एका स्मरणाने प्रेमभावाची लाट मनामध्ये निर्माण होई ॥ ५ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती महान असती ।

एक स्मरणाने तुमच्या चरणी येण्याची तळमळ जागृत होई ॥ ६ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती दिव्य असती ।

एक स्मरणाने मन शुद्ध होई ॥ ७ ॥

गुरुराया, तुमचे चरण किती महान असती ।

एक स्मरणाने सर्व स्वभावदोष अन् अहं नष्ट होई ॥ ८ ॥

गुरुराया, तुमच्या चरणी आता एकच प्रार्थना ।

या चरणांचे सदैव स्मरण राहो या हृदयात ॥ ९ ॥

– श्री. देवदत्त व्हनमारे, देहली