वर्धा, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – १४ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजनदिना’ला शासनाने प्रोत्साहन द्यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. यासमवेतच असे निवेदन १३ शाळा महाविद्यालये यांमध्येही देण्यात आले.