गोध्रा दंगलीतील मुख्य आरोपी रफीक हुसेन याला १९ वर्षांनंतर अटक

  • एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १९ वर्षांनंतर अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !
  • अशांना आता पोसत रहाण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
साबरमती एक्सप्रेस गाडीच्या कारसेवक असलेल्या डब्याला लावलेली आग

कर्णावती (गुजरात) – वर्ष २००२ मध्ये राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साबरमती एक्सप्रेस गाडीच्या कारसेवक असलेल्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणात पसार असणारा मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक या आरोपीला पोलिसांनी १९ वर्षांनंतर गोध्रा शहरातूनच अटक केली आहे.

स्वतःच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रफीक गोध्रा येथे आला असता त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. घटनेच्या काळात रफीक गोध्रा रेल्वे स्थानकावर कामगार म्हणून काम करत होता.