अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे साधिकेचे कपडे फाटणे

नामजपादी उपाय करण्याचा अवधी वाईट शक्तींची शक्ती आणि काळाची प्रतिकूलता यांच्यावर अवलंबून असतो. सध्या दोन्ही प्रतिकूल असल्यामुळे योगिताला एक वर्षभर तरी उपाय करावे लागतील. याचा अर्थ असा नाही की, तिचा त्रास वर्षभर तसाच असेल. तिच्या साधनेनुसार तो हळूहळू कमी होत जाईल.

या उदाहरणावरून साधकांनी लक्षात घ्यावे की, आता नेहमीचा उपायांचा काळ काही दिवस, आठवडे, महिने यांच्या भाषेत न मोजता वर्षाच्या भाषेत मोजण्याची मनाची सिद्धता केली पाहिजे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. योगिता पालन

१. साधिकेचे प्रतिदिन वापरातील कपडे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे फाटणे, त्यांना दुर्गंध येणे, त्यांचा स्पर्श नकोसा वाटणे, ते कपडे घालावेसे न वाटणे आणि ते कपडे घातल्यावर पूर्ण देहावर आवरण असल्याचे जाणवणे

‘एप्रिल २०२० पासून माझे प्रतिदिन वापरातील काही कपडे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे फाटत असल्याचे लक्षात आले. माझे एकूण ६ पोशाख (‘ड्रेस’) आक्रमणामुळे फाटले. ते अनाहतचक्राच्या ठिकाणी किंवा थोडे वर फाटलेले आढळून आले. ‘कपडे कधी फाटले ?’, ते लक्षात आले नाही; पण ‘सर्व कपड्यांना दुर्गंध येणे, स्पर्श नकोसा वाटणे, ते कपडे घालावेसे न वाटणे, ते कपडे घातल्यावर जडपणा जाणवणे आणि यामुळे पूर्ण देहावर आवरण असल्याचे जाणवणे’, असे होत असल्याचे लक्षात आले. ‘कपड्यांवर काहीतरी काळे-काळे आहे’, असे मला दिसायचे. मला आधी वाटायचे, ‘मी कपडे नीट धुवत नाही.’ मी कपडे व्यवस्थित धुतले, तरी त्याला साबणाचा सुगंध न येता पुष्कळ दुर्गंध यायचा.

२. अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे नामजपादी उपाय करूनही कपडे फाटणे

मी माझे फाटलेले सर्व कपडे कु. प्रियांका लोटलीकर यांना दाखवल्यावर त्यांनी हे आध्यात्मिक त्रासामुळे झाले असल्याचे सांगितले. मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारून घेण्यास सांगितले. पहिल्यांदा फाटलेला ‘टॉप’ मी सद्गुरु गाडगीळकाकांना दाखवल्यावर त्यांनी अनाहतचक्राच्या ठिकाणी ‘महाशून्य’ची पट्टी लावायला सांगितली. त्यानुसार मी नामजपादी उपाय करणे चालू केले. प्रत्यक्षात त्यांना पहिला ‘टॉप’ दाखवतांना त्याकडे दुरून पाहूनच पुष्कळ त्रास जाणवत होता. मी पाण्यात कापूर आणि गोमूत्र घालून कपडे धुते, तसेच कपड्यांवरही कापराची पूड घालते, तरीही ‘कपडे का फाटत आहेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते.

३. ‘नामजपादी उपाय करूनही कपडे फाटणे’, हे स्थुलातील महायुद्धाला लवकरच आरंभ होणार असल्याचे दर्शक असून आक्रमणाचा भाग सूक्ष्मातून पुन्हा स्थुलाकडे जात आहे’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगणे

थोड्या दिवसांनी माझा दुसरा ‘टॉप’ फाटला आणि वरीलप्रमाणे त्रासाचा भाग जाणवला. अशा प्रकारे एकूण ५ ‘टॉप’ फाटले असल्याचे लक्षात आल्यावर मी पुन्हा सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांकडे गेले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आता युद्धकाळ जवळ आला आहे. त्यामुळे आपण ‘सूक्ष्मातून स्थुलाकडे’ जात आहोत, म्हणजे पुष्कळ पूर्वी आरंभ स्थूल आक्रमणापासून झाला आणि पुढे पुढे सूक्ष्म आक्रमणापर्यंत आपण पोचलो, म्हणजे आपण अगदी नादापर्यंत पोचलो. या कालावधीत ‘कपडे फाटणे आणि कपड्यांवर रक्ताचे डाग पडणे’, अशी स्थुलातील आक्रमणे होत नव्हती, तर सूक्ष्मातील आक्रमणे व्हायची; पण आता स्थुलातील महायुद्धाला लवकरच आरंभ होणार असल्याने आक्रमणाचा भाग ‘सूक्ष्मातून पुन्हा स्थुलाकडे’ जात आहे. ‘कपडे फाटणे, अनेक ठिकाणी रक्ताचे डाग पडणे’, असे चालू झाले आहे. त्यांनी शिव आणि मारुति या देवतांची चित्रे अनाहतचक्रावर लावायला अन् कपड्यांमध्येही ठेवायला सांगितले आहे. अजूनही कपड्यांची स्थिती वरीलप्रमाणे होत असल्याचे लक्षात येत आहे.’

– कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(६.११.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.