‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून कु. गौरी फणसळकर यांनी साधनावृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यात झालेले पालट

कु. गौरी फणसळकर

१. सत्संग चालू होण्यापूर्वीची स्थिती

‘आधी मी नामजप आणि स्वयंसूचनांची सत्रे करणे, असे काहीच करत नव्हते. मला भ्रमणभाष आणि दूरदर्शनवरील मालिका पहाणे, गेम खेळणे, इंटरनेटवर वेळ घालवणे, बाहेर फिरायला आणि हॉटेलमध्ये जाणे, याच गोष्टी आवडायच्या आणि मी त्याच करत असे. मी घरात आईला कोणतेच साहाय्य करत नव्हते. मी आई-बाबांशी आणि आजीशी नीट बोलायचे नाही. मी आजीशी सतत भांडायचे. ‘मी नोकरी करून दमून आली आहे’, असे मला वाटायचे. त्यामुळे मी घरी बसून रहायचे. मी रात्री विलंबाने झोपायचे आणि सकाळी
आरामात उठायचे.

२. दळणवळण बंदी चालू झाल्यानंतरची स्थिती

मी भावसत्संग ऐकू लागले. मी साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे ऐकले. त्यानंतर ‘मलाही साधना करून याच जन्मी मोक्षाला जायला हवे. देवाच्या कृपेमुळे मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक व्हायला पाहिजे’, याची मला जाणीव होऊ लागली.

३. ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकू लागल्यानंतरची स्थिती

३ अ. स्वत:च्या चुकांची जाणीव होणे आणि व्यष्टी साधना करणे : पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सत्संग चालू झाला. पहिला सत्संग ऐकल्यावर ‘मी आतापर्यंत किती चुकीची वागत होते. मी एवढ्या चुका करत असूनही गुरुमाऊलींनी मला क्षमा करून ते माझी काळजी घेत आहेत. गुरुदेव माझ्यासाठी एवढे करत असूनही मी काहीच करत नाही. मी व्यष्टी साधना करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली. मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात आले. मी व्यष्टी साधना करू लागले. माझ्या मनात साधनेची तळमळ आणि ओढ निर्माण झाली.

३ आ. केलेले प्रयत्न

३ आ १. मी घरी आईला साहाय्य करू लागले. मी आजीशी नीट वागायला लागले. मी आई-बाबा आणि आजी यांची प्रत्यक्ष क्षमा मागितली. तेव्हा माझे मन पुष्कळ हलके झाले.

३ आ २. घराचा आश्रम बनवणे : घराचा आश्रम करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू झाले. ‘माझी गुरुमाऊली या आश्रमात येणार आहे’, हा भाव मनात निर्माण व्हायला लागला. आम्ही घरातील अनावश्यक सामान काढून टाकले. आम्ही घर नीट लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही घरातल्या वस्तूंची क्षमा मागितली. माझ्या मनात निर्जीव वस्तूंप्रती भाव निर्माण झाला.

३ आ ३. ‘आता १०० टक्के प्रयत्न करून पुढे जायचेच आहे’, हा माझा निश्‍चय झाला.

४. जाणवलेले पालट

अ. ‘प.पू. गुरुमाऊलींनी माझ्यासाठी किती केले आहे ! ते एवढी वर्षे माझी काळजी घेत आहेत. मला एवढे जपत आहेत आणि मी काहीच करत नाही’, हा अपराधीभाव माझ्या मनात निर्माण झाला. माझी आंतरिक तळमळ वाढली. ‘गुरुमाऊलींनी माझ्यासाठी दिलेला हा कृतज्ञताकाळच आहे’, याची मला जाणीव झाली.

आ. घरातील व्यक्तींमध्ये मोकळेपणा वाढला. आमचा एकमेकांना साधनेत साहाय्य करण्याचा भाग वाढला.

इ. मला स्वतःच्या चुका स्वीकारता येऊ लागल्या. माझ्याकडून चूक झाल्यास ती लक्षात येऊन मला लगेच क्षमा मागता येऊ लागली.

ई. घरातील वातावरणात पालट झाला. घरातील स्पंदने पालटली. घरात हलकेपणा जाणवतो. ‘घर आनंदी आहे’, असे जाणवू लागले.

उ. मी नोकरी पालटल्यामुळे सध्या मला वेतन नाही आणि ‘बाबांचे वेतन होणार कि नाही ?’, हे ठाऊक नाही. असे असूनही आमच्या कोणाच्याच मनात याचा ताण आला नाही. ‘या स्थितीत गुरुमाऊलीच हे घर चालवत आहे’, याची मला जाणीव झाली आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली. आता माझे ‘गुरुप्राप्ती’ हेच ध्येय निश्‍चित झाले आहे.

‘गुरुमाऊलींनीच माझ्या मनातील विचारांत आंतरिक पालट घडवून आणला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, यापुढे तुम्हीच माझ्याकडून माझ्या साधनेला पूरक असे प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. गौरी फणसळकर, कोथरुड, पुणे. (३०.४.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्यकरतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांतआहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्रदिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.