धोक्यांसाठी सज्ज रहाण्याऐवजी धोके निर्माण करणार्यांना नष्ट करण्यासाठी आता भारताने सज्ज होऊन कृती केली पाहिजे !
नवी देहली – भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला गंभीर विचार करणे भाग पडले आहे. आपल्या सीमांचे योग्य प्रकारे संरक्षण करणे, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली. ‘भारताला आणखी आक्रमक आणि भक्कम रहाणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
Present dangers cannot be ignored, says Army chief https://t.co/3ht1Vrjp3r
— Hindustan Times (@HindustanTimes) February 11, 2021