देवा, आठवण करीशी कधी-मधी ।
आनंद असा देशी भक्ता कधी-कधी ॥ १ ॥
देवा, तुझ्या स्मृतीचा हा आनंद ठेवा ।
जपून ठेवू आम्ही हा गोड मेवा ॥ २ ॥
सांगावे कोणत्या शब्दांत तुझे हे उपकार ।
कसा फेडावा देवा, तुझ्या ऋणांचा भार ॥ ३ ॥
भक्ताचीया ठायी प्रेम तुझे अनिवार ।
म्हणोनिया देव येतो होऊनिया साकार ॥ ४ ॥
मुंगीचेही जो जाणी मनोगत ।
न जाणे मन भक्ताचे, म्हणू कैसे आम्ही तुझेप्रत ॥ ५ ॥
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (१८.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |