सर्वसाधारण साधक आणि आध्यात्मिक उन्नती झालेला साधक यांच्या आवाजात जाणवलेला भेद

‘आपल्या आवाजात चैतन्य असेल, तर समोरील व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेते’, असे सांगितले होते. तेव्हापासून सर्वांच्या आवाजातील भेदांचे आपोआप परीक्षण होऊ लागले. त्यानंतर ‘साधक बोलत असतांना कसे वाटते ?’, याचा मी प्रयत्नपूर्वक अभ्यास करायला लागलो. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे लक्षात आली.

१. सर्वसाधारण साधकांचे बोलणे 

अ. सर्वसाधारण साधकांचा आवाज ऐकतांना तो जड वाटतो.

आ. त्यांचे बोलणे ऐकतांना थोड्या वेळाने नकोसे वाटते.

इ. ते सांगत असलेल्या विषयाच्या संदर्भात मनात प्रश्‍न किंवा विकल्प येतात.

२. आध्यात्मिक उन्नती झालेल्या साधकांचे बोलणे

अ. अध्यात्मात प्रगती असलेल्या साधकांच्या आवाजात जडत्व जाणवत नाही. त्यांचा आवाज एखाद्या पोकळीतून आल्याप्रमाणे पुष्कळ हलका जाणवतो.

आ. त्यांचा आवाज काळजाला भिडतो आणि मनात विकल्प येत नाहीत.

इ. ते बोलत असतांना कंटाळा येत नाही.

त्यामुळे ‘अध्यात्मात प्रगती होत असतांना साधकांमध्ये सूक्ष्मातून शारीरिक पालट होत असतात’, असे जाणवले.’

– गुरुचरणी, एक साधक (सप्टेंबर २०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक