लहानपणी मी शाळेत डबा घेऊन जात असे, तेव्हा माझ्या डब्यातील भाजी इतर विद्यार्थी मात्र फारशी खात नसत. कोल्हापूरमधील लोकांना झणझणीत तिखट खाण्याची सवय आणि माझी भाजी गोड लागायची; कारण त्यात गुळ घातलेला असायचा. मी आईला विचारायचो की, आपण स्वयंपाकात गुळ का वापरतो ? बरेच दिवस त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. गुरुचरित्रामध्ये माझ्या सद्गुरूंनी सांगितले आहे, ‘गुळमिश्रित अन्न शिळे होत नाही.’ मग आम्ही लागलो प्रयोगाला !
वांग्याची भाजी गुळ घालून आणि गुळ न घालता सिद्ध करून ठेवली २ दिवस.२ दिवसांनी पाहिले, तर गुळ घातलेल्या भाजीपेक्षा न घातलेली भाजी अतिशय सडलेली होती. आपल्याकडे प्रवासाला जातांना दीर्घकाळ टिकणार्या दशम्या या गुळापासून यासाठी तर बनवत नव्हते ? नक्कीच !
यानंतर केलेल्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. प्राचीन बांधकामामध्ये स्लॅब आणि माळवद टाकतांना चुन्यामध्ये गुळ घालत असत. अशा अनेक प्रयोगातून समजले गुळ हा अँटीफंगल (बुरशीविरोधी) आणि अँटीबॅक्टरियल (प्रतिजैविक) म्हणून काम करतो. ‘गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणार्या भरपूर प्रमाणातील ‘फॉस्फरस’ या मूलद्रव्यामुळे प्राप्त होतो’, हे स्व. राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.
गुळ घातलेल्या जेवणाचा उपहास करू नका, जे उत्तम आणि बुद्धीवर्धक आहे त्याचा स्वीकार करा !
– डॉ. अभिराम जोशी
(संदर्भ : व्हॉट्सअॅप)