कुठे आहेस रे कृष्णा ।
कोठे तू भेटशील देवा । आस लागली या वेड्या जिवा ।
ने मज आता पैलतिरा ॥ १ ॥
मंदिरात कि देवघरा । तूच माझा सखा ।
देहाचा नाही राहिला भरवसा । ने मज पैलतिरा ॥ २ ॥
अंत नको पाहूस देवा । तुझ्या वाटेकडे लागले डोळे ।
तुझे चरण पाहता मिटू देत डोळे ।
आनंद होऊ दे मना । ने मज आता पैलतिरा ॥ ३ ॥
‘सुधा’ (टीप १) हा वेडा भक्त ।
मन आहे माझे तृप्त ।
ने मज तुझ्या दर्शनाला ।
ने मज आता पैलतिरा ॥ ४ ॥
टीप १ : सुधाकर
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |