शासनाच्या निर्णयाचे व्यापारी संघटनेकडून स्वागत

पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – गोवा शासनाने अखेर वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोवा नगरपालिका (दुरुस्ती) अध्यादेश २०२० मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या कायदा विभागाने हा अध्यादेश मागे घेतल्यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अखिल गोवा व्यापारी संघटनेने गोवा शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या मते नवीन पालिका अध्यादेश व्यापार्यांसाठी अहितकारी होता. यामध्ये १० टक्के भाडेवाढ, १० वर्षांसाठी भाडेकरार आणि त्यानंतर लिलाव, ३ मास भाडे न दिल्यास भाडेकरार रहित करण्याची तरतूद, व्यापार्यांवर गुन्हा नोंदवण्याची तरतूद, विवाहित कन्येला वारसदार म्हणून दुकान देण्याचा अधिकार हिरावून घेणे आदी अयोग्य तरतुदी होत्या. त्याचप्रमाणे यामध्ये कारवाईचे अधिकार मुख्याधिकार्यांना देण्यात आल्याने ते त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता होती. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली होती. त्यानंतर शासनाने पालिका अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध