पणजी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या निषेधार्थ पणजी बाजारातील दुकाने बंद

प्रतिनिधिक छायाचित्र

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – पणजी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा निषेध करण्यासाठी ‘पणजी म्युनिसिपल मार्केट टॅनंट असोसिएशन’ याच्या नेतृत्वाखाली पणजी बाजारातील दुकानदारांनी १४ जानेवारी या दिवशी दुकाने बंद ठेवली. पणजी महानगरपालिकेने १३ जानेवारी या दिवशी पणजी बाजारात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून काही अतिक्रमणे पाडली होती. या पार्श्‍वभूमीवर संघटनेने हा ‘बंद’ पाळला.

मार्केटमधील दुकानदार म्हणाले, ‘‘अनुमती दिलेली असतांना महानगरपालिका आता ते अतिक्रमण ठरवून पाडत आहे.’’ या आरोपाला प्रत्युत्तर देतांना पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर म्हणाले, ‘‘दुकानदारांचा आरोप निरर्थक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.) ने १२ जानेवारी या दिवशी बाजाराची पहाणी करून केलेल्या शिफारसीवरून महानगरपालिका कारवाई करत आहे.’’