अखिल भारतीय हिंदु महासभा कोल्हापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

कोल्हापूर – गेल्या महापालिका निवडणुकीत हिंदु महासभेने उमेदवार दिले होते. त्याचप्रमाणे वर्ष २०२१ ची कोल्हापूर महापालिका निवडणूकही अखिल भारतीय हिंदु महासभा स्वबळावर लढवणार आहे. समाजातील होतकरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य देणार्‍यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. तरी ज्यांना यात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे त्यांनी अपेक्षित कागदपत्रांसह श्री. मनोहर सोरप, माऊली चौक, राजारामपुरी, १३ वी गल्ली, भ्रमणभाष क्रमांक – ८८८८९०४२४२ येथे, तसेच श्री. संजय कुलकर्णी, १७०७ बी-वॉर्ड, शिंदे गल्ली, मंगळवार पेठ येथील कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन अखिल भारतीय हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.