आज ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी’चे आळंदी (जिल्हा पुणे) येथून प्रस्थान आहे. त्या निमित्ताने…
हिंदु धर्माचे भूषण असणार्या वारकरी भागवत संप्रदायाला धर्मापासून तोडण्यासाठी प्रयत्न करणार्या या घुसखोरांचे काय करायचे ?, असा प्रश्न आज उपस्थित होतो. जसे शिखांमध्ये फूट पाडून खलिस्तान चळवळ चालू झाली, कर्नाटकात स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळ चालू आहे, आदिवासींचा वेगळा धर्म म्हणून बुद्धीभेद करण्यात येत आहे. आता काय, तर वारकरी संप्रदाय आणि वैदिक हिंदु धर्म यांच्यात फूट पडण्यासाठी षड्यंत्र चालू आहे. यावरून काय लक्षात घ्यायचे ?

१. वारकरी संप्रदाय वेगळा धर्म करण्याविषयी साम्यवादी षड्यंत्र
हिंदु समाजात फूट पाडून सर्वांना वेगळे करायचे आणि स्वतःचा हेतू साध्य करायचा, हे जिहादी आणि देशविघातक शक्तींचा अजेंडा (कार्यसूची) आहे. त्याला काही राजकीय पक्ष मतांसाठी साथ देत आहेत. या फुटीरतावादी शक्तींना नास्तिकवादी राजकारण्यांनी कायमच राजाश्रय दिला. त्याचेच हे परिणाम आहेत.
‘वारकरी संप्रदाय हा वेगळा धर्म म्हणून हिंदुत्वापासून वेगळा करायचा’, अशी मांडणी चालू आहे आणि त्यासाठी वैदिक अन् वारकरी कसे वेगळे आहेत, याविषयी मांडणी करणारे काही साम्यवादी विचारांचे लोक धोतर नेसून स्वतःला ‘ह.भ.प.’ म्हणून फिरत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
२. विद्रोही, जातीयवादी आणि नास्तिक मानसिकतेच्या लोकांनी वारकरी संप्रदायात लुडबूड करण्याचे प्रयोजन काय ?
हिंदु धर्म हा अनेक मत, पंथ आणि संप्रदाय यांनी मिळून सिद्ध झाला आहे. हिंदु धर्म एका चौकटीत बंदिस्त व्हायला काही पंथ किंवा ‘रिलीजन’ नाही. ‘हे विविध संप्रदाय एकाच सत्याकडे जाणारे मार्ग आहेत’, अशीच सहस्रो वर्षांपासून हिंदूंची धारणा आहे. ते वेगळे धर्म कसे होतील ?
वारकरी संप्रदाय तर हिंदु धर्माचे रक्षण, सामाजिक ऐक्य आणि सर्वांना ईश्वराकडे आणण्ो यांसाठी स्थापन झालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ‘पसायदाना’मधून जगाला ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ करण्याचे आवाहन करतात, म्हणजेच सनातन धर्माच्या वाटेवर आणायला सांगतात. त्यामुळे विद्रोही, ब्रिगेडी, जातीयवादी आणि नास्तिक मानसिकतेच्या लोकांनी वारकरी संप्रदायात लुडबूड करण्याचे प्रयोजन काय ?
३. वारकरी संप्रदायात घुसलेल्या घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवा !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार जे स्वतःला नास्तिक म्हणवतात, त्यांनी वारकरी संप्रदायावर का बोलावे ? त्यांना ते नैतिक अधिकार आहे का ? आणि त्याच राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या काही ढोंगींनी स्वतःला वारकरी म्हणवून घ्यावे का ? याचा विचार करावा. जे शरद पवार आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मटण खाऊन येत असतील, त्यांच्या दावणीला बांधलेल्या लोकांचे वारकरी संप्रदायात काय काम आहे ? स्वतःला ह.भ.प. म्हणवणार्या तथाकथित लोकांनी कुणाकडून ‘ज्ञानेश्वरी गाथा’ आणि ‘एकनाथी भागवत’ यांचे अध्ययन केले, हे समाजाला सांगावे. वारकरी संप्रदायात घुसलेले हे घुसखोर नास्तिकवादी राजकारणी, म्हणजे फुटीरतावाद पसरवणारे समाजकंटक आहेत. त्यांना वारकरी संप्रदायातून बाहेरचा रस्ता दाखवणे आवश्यक आहे.
– ह.भ.प. धनंजय जगताप, युवा कीर्तनकार, आळंदी, पुणे.
‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीसुमनांचा अर्थबोध
तुकाराम मुंढेंच्या धडक कारभाराने यंत्रणा गतीमान !
पावसामुळे घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात होणार !
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !