पुणे येथे प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन !

पुणे – गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. आपले सर्व ज्ञान वेदांमधून आले असून वेद समजणे अवघड असल्याने पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. १८ पुराणे आणि ४ वेद यांमध्ये अनेक विषयांचा ऊहापोह असला, तरी गोमातेचे महत्त्व हा सर्व पुराणांमधील समान धागा आहे. विष्णुपुराणातही गोमातेचे महत्त्व वर्णन केले असून शिवपुराणात गोहत्येला ब्रह्महत्येसमान महापाप मानले आहे. गायीची सेवा हे परम पुण्य असून तोच खरा धर्म असल्याचे विविध पुराणांमध्ये सांगितले आहे, असे वक्तव्य ह.भ.प. परेश बुवा देवळणकर यांनी केले.
‘ग्रंथ पारायण दिंडी, पुणे’ आणि ‘गीताधर्म मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील ‘गीताधर्म मंडळ’ येथे प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी गोकथेचे निरूपण करतांना ह.भ.प. परेश बुवा देवळणकर बोलत होते.
कथेच्या पहिल्या दिवशी कपिला गायीचे विधीवत पूजन करण्यात आले. या वेळी ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे, ‘गीताधर्म मंडळ’ अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, वे.मु. ओमकार सप्रे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गोशाळांचे व्यवस्थापन आणि गोसेवेचे कार्य निष्ठेने चालवणार्या गोशाळा संचालकांचा सन्मान करण्यात आला, तसेच विविध गोशाळांना आर्थिक साहाय्य आणि देणग्या यांचे वितरणही करण्यात आले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !