न्यायामूर्तींची संख्या प्रथमच ३७ झाली !
पुढील १५ दिवसांत २ न्यायमूर्ती निवृत्त होणार असल्याने संख्या होणार ३५ !

नवी देहली – भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ५ नवीन न्यायाधिशांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदाची शपथ दिली. या नियुक्त्यांमुळे न्यायमूर्तींची एकूण संख्या प्रथमच ३७ झाली आहे. आता न्यायालयातील आवश्यक ३८ पदांपैकी केवळ एक पदच रिक्त राहिले आहे. तथापि १६ जूनला न्यायमूर्ती पंकज मिथल आणि २८ जूनला न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी निवृत्त होत असल्याने एकूण संख्या ३५ वर पोचेल.
हे आहेत सर्वाेच्च न्यायालयातील ५ नवे न्यायमूर्ती !
१. ज्येष्ठ अधिवक्त्या वेंकिटा सुब्रमणी मोहना
२. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर
३. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू
४. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा
५. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली
अधिवक्त्या वेंकिटा सुब्रमणी मोहना यांचे विशेषत्व !
ज्येष्ठ अधिवक्त्या वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची नियुक्ती विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्यानंतर देशात ‘बार’मधून (अधिवक्ता मंडळींतून) थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणार्या त्या दुसर्याच महिला अधिवक्त्या आहेत. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात २ महिला न्यायाधीश आहेत – न्यायमूर्ती मोहना आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना. न्यायमूर्ती नागरत्ना या वर्ष २०२७ मध्ये एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी भारताच्या सरन्यायाधीश बनणार आहेत.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत