
पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त १६ जुलै या दिवशी श्रींचा पलंग काढून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ घंटे दर्शन चालू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशी २५ जुलै या दिवशी असून पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.
मंदिरे समितीच्या सभेत आषाढी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दर्शनरांग व्यवस्था, थेट प्रक्षेपित दर्शन (थेट प्रक्षेपणाची सुविधा), सुरक्षा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नछत्र, निवास व्यवस्था आणि भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.
श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री व्यंकटेश मंदिर येथील जतन-संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात असून जुलैमध्ये ही मंदिरे भाविकांसाठी दर्शनास खुली करण्यात येणार आहेत. मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्यासाठी स्वतंत्र नियमावली सिद्ध करण्याचाही निर्णय घेण्यात आला, तसेच भक्तनिवासातील खोल्या वातानुकूलित करणे, २४ घंटे गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आणि अधिकृत मठांमध्ये स्वच्छतागृहे उभारणे यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !