राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाचा निर्णय !
मराठी भाषेला सर्वसमावेशक भाषा म्हणून सक्षम करण्याचे उद्दिष्ट !

अमरावती – राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाने १० अब्ज शब्दांचा मराठी शब्दकोश सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या मराठी शब्दकोशात साधारणपणे दीड लाख शब्दांचा संग्रह आहे. राज्याच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘विकसित महाराष्ट्र, २०४७’ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्युमेंट’ (दृष्टीपत्र) सिद्ध करण्यात आले आहे. या अंतर्गत १६ क्षेत्रीय गट निवडण्यात आले आहेत. यात ‘सम्यक शक्ती’ या गटांतर्गत ६ विभाग असून मराठी भाषा विभाग हा त्यापैकी एक विभाग आहे. त्या अंतर्गत संस्कृती आणि ज्ञान यांसाठी मराठी भाषेला आधुनिक अन् सर्वसमावेशक भाषा म्हणून सक्षम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
A 10-billion-word Marathi dictionary will be compiled!
Decision by the State Government’s Marathi Language Department!
Objective to strengthen Marathi as a modern and all-inclusive language!
The decision to compile a dictionary to enrich the Marathi language is commendable! pic.twitter.com/TvMHz90Vq1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
मराठी भाषेचे ‘डिजिटायजेशन’ करणे, हा या उपक्रमाचा टप्पा आहे. त्यात छापील पृष्ठांचे स्कॅनिंग करणे, श्राव्य लिखाण संग्रही ठेवणे आणि मराठी नाटकांचे संहिताकरण करणे, तसेच १० अब्ज शब्दांचा मराठी शब्दकोश सिद्ध करणे ही कामे हाती घेण्यात येणार आहे. दुर्मिळ मराठी हस्तलिखिते आणि प्राचीन माहितीचे अद्ययावतीकरण अन् अनुवाद करणे हे उपक्रम राबवण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन