सातारा, २५ मे (वार्ता.) – ऑनलाईन पद्धतीने अमेरिकेतील नागरिकांना फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणार्या बनावट ‘कॉल सेंटर’वर (ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवणार्या विभागावर) सातारा पोलिसांनी धाड घातली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कोरेगाव पोलीस यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटमधून सातारा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, राजस्थान येथून १७ संशयितांना कह्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये ३५ लाख ३४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, भ्रमणसंगणक, भ्रमणभाष आणि अमेरिकन नागरिकांच्या माहितीचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सातारा येथील बनावट ‘कॉल सेंटर’च्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक !
संपादकीय भूमिका
फसवणुकीद्वारे गुन्हेगारांचे वाढते प्रमाण, हे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे द्योतक !

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव