
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन हे मंदिरे समितीच्या वतीने पूर्णतः नि:शुल्क स्वरूपात दिले जाते. दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क, देणगी अथवा रक्कम आकारली जात नाही, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
अलीकडे समाजमाध्यमांवर एक ‘ऑडिओ क्लिप’ (ध्वनीफीत) मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. त्यात अज्ञात व्यक्तीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी ‘पास’ उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित व्यक्तीकडून भ्रमणभाष क्रमांकाद्वारे ‘डिजिटल’ पद्धतीने रक्कम स्वीकारण्यात आल्याचेही समोर येत आहे.
हा प्रकार भाविकांची आर्थिक फसवणूक करणारा असून मंदिर समितीची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तरी कुणीही व्यक्ती दर्शनासाठी पैसे, पास किंवा विशेष सुविधा देण्याच्या नावाखाली मागणी करत असल्यास तात्काळ मंदिर समिती कार्यालयाकडे तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी केले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव