थेट प्रक्षेपणासह धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी, ११ मे (जि.मा.का.) – भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था’ या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले. तहसीलदार कार्यालय देवगडच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गुजरातमधील सोमनाथ येथे पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. मंदिर परिसरात एल्ईडी स्क्रीन (पडदा) आणि ध्वनी व्यवस्थेची विशेष सुविधा उपलब्ध केली होती. त्यामुळे भाविक आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. या वेळी कुणकेश्वर मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत् रोषणाई यांनी उजळून निघाला होता. धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, ओंकार जप आणि भजन यांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या वेळी सोमनाथ मंदिराचा इतिहास, पुनर्निर्माण आणि भारतीय संस्कृतीतील महत्त्वाविषयी माहिती देण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, तसेच नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन