पंढरपूर येथे ‘यमाई तलाव बचाव समिती’ची जनआंदोलनाची चेतावणी

पंढरपूर – येथील ऐतिहासिक यमाई तलाव आणि त्याशेजारील जागा ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’च्या गोशाळेच्या विस्तारासाठी देऊ नये, अशी मागणी ‘यमाई तलाव बचाव समिती’ने केली आहे. ही जागा गोशाळेसाठी दिल्यास जनआंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. याविषयी पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते सुजितकुमार सर्वगोड, नगरसेवक अधिवक्ता सुनील वाळूजकर, अमोल डोके, अधिवक्ता गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, इब्राहिम बोहरी, शरद माने, मालोजी शेंबडे, गणेश शिंदे नाईक आदींनी जिल्हाधिकारी कार्तिकीयन एस्. यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यमाई तलाव हा वर्ष १८८२ पूर्वीचा ऐतिहासिक तलाव असून इंग्रज काळापासून पंढरपूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. सध्या या तलावाचा विकास ‘राज्य सरोवर संवर्धन योजने’तून करण्यात आला असून तो पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित झाला आहे. तसेच येथे चालण्याचा मार्ग, तुळशीवृंदावन (बगीचा) आणि पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षण मनोरा (वॉच टॉवर) यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक व्यायाम, फिरणे आणि विरंगुळ्यासाठी येत असल्याने ही जागा गोशाळेसाठी देणे अयोग्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !