गोवा मंत्रीमंडळ बैठक

पणजी, ७ मे (वार्ता.) – निरनिराळ्या वस्तू आणि अन्न प्रक्रिया केंद्रे यांचे व्यवस्थापन अन् देखभाल करणे, यांसाठी सरकारने ‘गोवा लाइवलीहूड फोरम’ (गोवा उपजीविका संस्था) या संस्थेला मान्यता दिली आहे. या उपक्रमासाठी १ कोटी रुपये निधी संमत केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा मंत्रीमंडळाच्या ७ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात १० प्रक्रिया केंद्रे आहेत आणि ही केंद्रे चालवण्याचे दायित्व आता ‘गोवा लाइवलीहूड फोरम’ या संस्थेकडे असणार आहे.’’
मंत्रीमंडळातील अन्य महत्त्वाचे निर्णय
१. सरकारी कर्मचार्यांना प्रतिमास वेतन देणे आणि निवृत्त कर्मचार्यांना वेळेत निवृत्ती वेतन देणे शक्य व्हावे, यासाठी सरकारने अत्याधुनिक सेवा देणार्या ‘इनस्टेप सीनर्जीस प्रा.लि.’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेकडे सामंजस्य करार करण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
२. सरकारने धारबांदोडा येथील ८० सहस्र मेट्रीक टन खाणमाल हाताळण्यासाठी ‘सेझारीसोर्सीस प्रा.लि.’ या आस्थापनाला मान्यता दिली आहे.
३. ‘गोवा पुनर्वसन मंडळा’ची २३ पदे आणि गृहनिर्माण मंडळाच्या कनिष्ठ अभियंत्यांची (सीव्हील) २ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४. नामवंत ‘न्युरो सर्जन’ डॉ. पुनराज यांच्या निवृत्तीनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
५. शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, भरतनाट्यम्, कथक, नाट्यकला, दशावतार आणि गोव्याच्या लोककला यांसारख्या सादरीकरण कलांमध्ये प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अन् मानधन योजना घोषित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ सहस्र ६०० ते ९ सहस्र रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मे आहे.
| आसाम आणि बंगाल येथील शपथविधी सोहळ्यांना उपस्थित रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – मी आसाम आणि बंगाल येथील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यांना उपस्थित रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साकोर्डा येथील वाघिणीच्या मृत्यूच्या प्रकरणी वन खात्याचा संबंधित अहवाल आल्यानंतर यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले. |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !