शबरीमला प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या संस्थेला फटकारत विचारला प्रश्न
नवी देहली – शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाशी संबंधित याचिकांवरील सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’ला कठोर शब्दांत फटकारले. न्यायालयाने वर्ष २००६ मध्ये प्रविष्ट केलेली जनहित याचिका ही कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे सांगत ‘तुम्ही ही याचिका का प्रविष्ट केली? तुम्ही देशाचे मुख्य पुजारी आहात का?’, असा प्रश्न विचारला.
"Are you the Chief Priest of the country?" ⚖️
The Supreme Court slams the Indian Young Lawyers Association (IYLA) over the 2006 Sabarimala PIL, calling it an "abuse of the legal process."
#Sabarimala #SupremeCourt #LegalNews #CJISuryakant#JusticeMMSundresh
PC: @LawChakra pic.twitter.com/2nOUGPGbgj— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
१. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, कोणतीही कायदेशीर संस्था वैयक्तिक श्रद्धेचा दावा करू शकत नाही. एखाद्याची व्यक्तीची कुणावर तरी श्रद्धा असू शकते, संस्थेची कुणावर श्रद्धा आहे, असे होत नाही. तुमच्याकडे सद्सदविवेकबुद्धी नाही.
२. न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनीही संस्थेला विचारले की, याचिका प्रविष्ट करण्यासाठी कोणताही औपचारिक प्रस्ताव संमत करण्यात आला होता का ? आणि संस्थेच्या अध्यक्षांनी त्याला संमती दिली होती का?
३. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, अशा याचिका प्रविष्ट करण्याऐवजी संस्थेने तरुण अधिवक्त्यांच्या हितासाठी काम केले पाहिजे.
४. न्यायमूर्ती नागरत्ना यांनीही म्हटले की, ग्रामीण भागांतून येणार्या प्रतिभावान तरुण अधिवक्त्यांना सहकार्य करणे आणि त्यांच्यासाठी संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे अधिक महत्त्वाचे आहे.
५. संस्थेच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, संस्थेचा उद्देश भगवान अयप्पा यांच्या भक्तांच्या श्रद्धेला आव्हान देणे नसून ती टिकवून ठेवणे हा आहे. मंदिराच्या मुख्य पुजारींनी पूर्वी असे मत व्यक्त केले होते की, अल्प वयोगटातील महिलांचा प्रवेश देवतेच्या इच्छेविरुद्ध आहे.

इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court