शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ६ लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी

प्रातिनिधिक छायाचित्र AI निर्मित

पुणे – ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या वतीने २१ जून या दिवशी घेतल्या जाणार्‍या ‘शिक्षक पात्रता परीक्षे’ला (‘टीईटी’ला) ६ लाख २ सहस्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिली ते आठवीला शिकवणारे शिक्षक, सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित आणि विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांच्या व्यतिरिक्त सेवेतीलही शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा देणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. २१ जून या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.