
पुणे, २२ एप्रिल (वार्ता.) – नाशिक येथे झालेल्या ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’च्या विरोधात येथील विमाननगर येथे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले. २० एप्रिल या दिवशी झालेल्या या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ‘पुणे बार असोसिएशन’चे सदस्य अधिवक्ता राहुल कदम, प्रखर हिंदुत्वनिष्ठ सुशांत गाडे, श्री. दिलीप देवकर, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे आंदोलन होतांना पाहून परिसरातील ‘परवीन फ्लीटस’ आस्थापनातील काही कर्मचारी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात उपस्थित युवक-युवती यांनी जोरदार घोषणा देत ‘कॉर्पोरेट जिहाद’चा निषेध केला.
‘कॉर्पोरेट जिहाद’मध्ये केवळ महिला नव्हे, तर पुरुषांचेही धर्मांतर ! – सर्वेश मेहेंदळे, लेखापरीक्षक

कॉर्पोरेट जिहादमध्ये केवळ महिला नव्हे, तर पुरुषही लक्ष्य होत आहेत. गोरगरीब ते उच्चशिक्षित हिंदूंना या धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याच्या जिहाद्यांच्या कारस्थानाच्या विरोधात आता आपण सर्वांनी संघटित होऊया. हिंदु युवती, महिला यांनी धर्मशिक्षण घ्यायलाच हवे; परंतु आता त्यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकावे आणि वेळप्रसंगी स्वतःचे रक्षण करावे.
सर्व प्रकारचे जिहाद थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच एकमेव उपाय ! – सुशांत गाडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

हिंदु राष्ट्र आल्यास हिंदूंवरील आघात थांबतील. आज जे काही कायदे होत आहेत, त्यांचे कठोर पालन होण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य होय. या स्वराज्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राचा निर्धार करूया.
समितीच्या हिंजवडी येथील आंदोलनानंतर अनेक घटनांच्या विरोधात तक्रारी आल्या ! – अधिवक्ता राहुल कदम

हिंदु जनजागृती समितीने ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात हिंजवडी येथे आंदोलन केले. त्यानंतर अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या आंदोलनाद्वारे हिंदू जागृत होत आहेत. अशा घटना जिथे घडत आहेत, तिथे प्रत्येकाने पोलीस ठाण्यात तक्रारी द्याव्यात. या प्रकरणात कोणतेही कायदेशीर साहाय्य लागल्यास आम्ही निश्चित साहाय्य करू.
पुण्यातील ‘आयटी पार्क’मध्ये धर्मांतरासारखे प्रकरण होत आहे का ? याची चाचपणी करावी ! – सचिन घुले, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

नाशिक येथे झालेल्या घटनेनंतर सर्वच ठिकाणी असे ‘आयटी पार्क’ असतील, तिथे अशा घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘कॉर्पोरेट’ या गोंडस नावाखाली पुण्यातील खराडी, फुरसुंगी येथील ‘आयटी पार्क’ मध्येही अशा धर्मांतराच्या घटना होत नाहीत ना, याची चाचपणी प्रशासनाने करायला हवी.
छत्रपती शिवरायांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे जिहाद्यांना चौकात आणून शिक्षा करा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

शिर्डीच्या ‘डीमार्ट’मध्येही नाशिक सारखा प्रकार घडला असून हिंदु मुलाचे धर्मांतर करण्यात आले आहे. हिंजवडी येथे आपले आंदोलन झाल्यानंतर अशा प्रकारच्या काही घटनांविषयी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद झाल्या. या घटना थांबाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला केलेल्या शिक्षेसम या जिहाद्यांना चौकात आणून शिक्षा करायला हवी, तरच पुढे अशी प्रकरणे पुन्हा होणार नाहीत.
नाशिकमधील जिहाद प्रकरणी निदा खानला तत्परतेने अटक करावी ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा
पी.एफ्.आय. या आतंकवादी संघटनेवर बंदी आणली होती, त्या काळात अनेक ठिकाणी धाडी घातल्या आणि ‘गझवा-ए-हिंद (म्हणजे भारताचे इस्लामीकरण करणे) या षड्यंत्राला पार पाडण्यासाठी विविध जिहाद कसे असू शकतात ? याविषयीची कागदपत्रे मिळाली होती. आज आपण तेच विविध जिहाद प्रत्यक्ष घडतांना पहात आहोत. नाशिक प्रकरणातील निदा खान अद्याप पसार असून ती जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. पोलिसांनी तिला तत्परतेने शोधून काढून अटक करावी.
प्रत्येक बहुराष्ट्रीय आस्थापनात महाराष्ट्र शासनाने चौकशी करावी ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

हिंदूंच्याच देशात राहून हे जिहादी हिंदूंवर अत्याचार करत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक बहुराष्ट्रीय आस्थापनात शासनाने चौकशी करावी. हिंदूंवर होणारे अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत.
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !