
वेंगुर्ला – दुर्मिळ मानल्या जाणार्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ (Ambergris – ब्लू व्हेल माशाची उलटी) तालुक्यातील शिरोडा परिसरात अवैधरित्या विक्री करण्याचा प्रयत्न वन विभागाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. ही कारवाई १६ एप्रिलला करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईच्या वेळी वन विभागाच्या पथकाने ९ किलो १२० ग्रॅम वजनाच्या अनुमाने ७ कोटी रुपये किमतीच्या ‘अंबरग्रीस’सह अन्य मुद्देमाल कह्यात घेतला.
शिरोडा परिसरात काही व्यक्ती ‘अंबरग्रीस’ची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाने काही पथके सिद्ध केली. त्यानंतर वनक्षेत्रपालांचे फिरते पथक आणि वनपरिक्षेत्र कुडाळ येथील कर्मचारी यांनी बनावट ग्राहक बनवून सापळा रचला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कारवाई करून वन विभागाच्या पथकाने रणजित रामचंद्र नायर, गुरुनाथ नाईक, विभव आडारकर आणि नीलेश मनोहर पांडजी यांना अटक केली.
ब्लू व्हेल माशाच्या उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आणि किंमत अधिक मिळत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरूपाचे गुन्हे सध्या घडत आहेत. अशा घटना होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाच्या स्थानिक कार्यालयात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हेल माशाची उलटी, ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘अंबरग्रीस’ (Ambergris) म्हणतात. हा व्हेल माशाच्या आतड्यात बनणारा मेणासारखा एक पदार्थ आहे. ही प्रत्यक्ष उलटी नसून पचन न झालेल्या अन्नामुळे बनणारा एक दुर्मिळ पदार्थ आहे. हा पदार्थ मासा बाहेर टाकतो. याचा वापर अत्तर किंवा सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो.
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सरकारची उद्यापासून ९० दिवस वृक्षारोपण मोहीम
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !