सांडपाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा महापौर रोहित मोन्सेरात यांचा दावा

पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – मळा, पणजी येथील तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर महापौर रोहित मोन्सेरात यांनी ही घटना सांडपाण्यामुळे घडल्याचा दावा केला आहे. यामुळे पणजी शहरातील सांतइनेज खाडीच्या प्रदूषणाविषयी नकारात्मक भूमिका घेणार्या पणजी महानगरपालिकेची भूमिका उघडी पडली आहे.
शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सांतइनेज खाडीत सोडले जात असल्याचे आरोप यापूर्वी अनेकदा झाले होते; मात्र याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे जलसंपदा खात्याकडून खाडी पुन्हा प्रवाही करण्यासाठी चालू केलेल्या प्रयत्नांना महापालिकेचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नव्हता. आता मळा तलावातील माशांच्या मृत्यूमुळे सांडपाणी व्यवस्थापनाविषयी प्रश्न उपस्थित झाला असून याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या समस्येवर सर्वसमावेशक दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी सरकारी खात्यातील विविध विभागांची एक संयुक्त बैठक १५ एप्रिल २०२६ या दिवशी बोलावण्यात आल्याची माहिती मोन्सेरात यांनी दिली. (माशांचा मृत्यू झाल्यावर जागी झालेली महापालिका ! अनेक दिवसांपासून ही समस्या असतांना त्या वेळी दुर्लक्ष का करण्यात आले ? काही अपघात घडतो का ? याची महापालिका प्रशासन आणि मंडळ वाट पहात होते का ? – संपादक)
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
सरकारची उद्यापासून ९० दिवस वृक्षारोपण मोहीम
गोव्यातील पर्तगाळ मठात वस्त्रसंहिता कठोरतेने लागू