कोल्हापूर येथील उजळाईदेवीच्या मंदिरात भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात कपडे घालून येण्याच्या संदर्भातील नियमावली)

कोल्हापूर, १० एप्रिल (वार्ता.) – मंदिर महासंघाच्या पुढाकारातून उजळाईदेवीच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. या प्रसंगी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अशोक गुरव, सौ. आशाराणी गुरव, भाविक श्री. उत्तम आडसूळ, श्री. प्रवीण शिंदे या शिवाय अन्य भाविक उपस्थित होते.

या संदर्भात अधिक माहिती देतांना मंदिराचे परंपरागत पुजारी श्री. अशोक गुरव म्हणाले, ‘‘मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. त्यामुळे या प्रकारचा फलक लावण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याचप्रकारे अन्य मंदिरांमध्येही या प्रकारचे फलक लावण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.’’