सिंहस्थ कुंभपर्वाच्या विकासकामांना गती द्यावी ! – आयुक्त शेखर सिंह

नाशिक – येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील विकासकामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पहाणी केली. या वेळी त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणा’चे आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.