कणकवली आणि सावंतवाडी येथे चोरांनी १२ दुकाने फोडली

प्रतिकात्मक चित्र

सिंधुदुर्ग – कणकवली-आचरा या नेहमी गजबजलेल्या मार्गावर ४ एप्रिल या दिवशी पहाटे ६ दुकाने आणि सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ६ दुकाने, अशी एकूण १२ दुकाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलग २ दिवस घडलेल्या या प्रकारांमुळे व्यापार्‍यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आचरा मार्गावरील ‘सना कॉम्प्लेक्स’ मधील ३ आणि येथून काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूच्या ३ दुकानांची दारे (शटर) उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असतांनाही चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. तेथून काही अंतरावरच कणकवली पोलीस ठाणे असल्याने या परिसरात चोरी होणे ही गंभीर गोष्ट मानली जात आहे.

५ एप्रिल या दिवशी पहाटे सावंतवाडी शहरातही असा प्रकार झाला. येथे फोडण्यात आलेल्या ६ पैकी २ दुकानांतून रोख रक्कम चोरण्यात आली; मात्र उर्वरित ४ दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.