सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांकडून पांडवलेणी आणि परिसराची पहाणी !

मुंबई – वर्ष २०२७ मध्ये नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ४ एप्रिल या दिवशी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नाशिक येथील पांडवलेणी आणि परिसराची पहाणी केली. या वेळी सिंहस्थ कुंभपर्वाला येणार्या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, माहिती फलक, प्रवेशमार्ग, सुरक्षाव्यवस्था आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात, असे आवाहन राजेश अग्रवाल यांनी केले.
या वेळी राजेश अग्रवाल यांच्या समवेत ‘कुंभमेळा विकास प्राधिकरणा’चे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, ‘कुंभमेळा विकास प्राधिकरणा’चे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक (पूर्व) सेपट, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, पुरातत्व विभागाचे साहाय्यक अधीक्षक अभियंता हेमंतकुमार हुकरे आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी राजेश अग्रवाल यांनी २२ गुंफांची पहाणी केली. लेणी परिसरात वाहनतळाची व्यवस्था, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना आणि डिजिटल माहि;ती प्रणाली विकसित करणे यांवर भर देण्याचे आवाहन राजेश अग्रवाल यांनी केले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव