कास (सातारा) परिसरात वन्यप्राण्यांसाठी ४० हून अधिक पाणवठ्यांची निर्मिती !

सातारा, २४ मार्च (वार्ता.) – जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर सध्या तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. याचा परिणाम वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यावर दिसून येत आहे. वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ‘कास पठार समिती’ आणि वन विभाग यांनी पुढाकार घेत कास परिसरात ४० ते ५० पाणवठे निर्माण केले आहेत.