पणजी, २३ मार्च (वार्ता.) – ऑनलाईन आक्षेपार्ह साहित्याची नोंद घेऊन गोवा पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात स्वेच्छा प्रथमदर्शनी गुन्हा (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात प्रारंभ केला आहे. महिला, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा सामाजिक शांती आणि सलोखा भंग करणारे साहित्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जात आहे. यामध्ये सामाजिक माध्यमावर देखरेख ठेवणारे पोलीस शिपाई तक्रारदार आहेत.
आतापर्यंत गुन्हा नोंद झालेली काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. चिंबल येथील ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ या सरकारने रहित केलेल्या प्रकल्पावरून मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यावर टीका करणारे लिखाण प्रसारित करणे
२. दाबोळी विमानतळ बंद होणार, अशी चुकीची माहिती असलेला ‘दाबोळी फाईल’ नावाचा कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित समाजाची दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करणे
३. स्वातंत्र्यसैनिकांनी ‘व्हिवा पोर्तुगाल’ म्हणण्यास विरोध करणे आणि या प्रकरणी समाजाला भडकवणारी ‘पोस्ट’ बनवणे
४. हरमल येथे योग कार्यशाळेच्या आयोजनासंबंधी विज्ञापनामध्ये लैंगिक सूचक कथानकांना आध्यात्मिक किंवा उपचारात्मक पद्धत म्हणून सादर करणे
वरीलप्रमाणे आणि अशाच प्रकारच्या अन्य काही साहित्याच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशा साहित्यामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !