
रत्नागिरी – कुख्यात आतंकवादी आणि वर्ष १९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांविषयी केंद्रशासनाने कारवाई पूर्ण केली आहे. जिल्ह्यात असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके येथील दाऊदच्या ४ वडिलोपार्जित भूमींचा यशस्वी लिलाव झाला असून मुंबईतील एका गुंतवणूकदाराने या सर्व भूमी खरेदी केल्या आहेत.
१. केंद्रशासनाच्या ‘साफेमा’ (द स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स (फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी) अॅक्ट, म्हणजेच तस्कर आणि परकीय चलन फेरफार करणारे (मालमत्ता जप्ती) कायदा) अंतर्गत या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या भूमींना खरेदीदार मिळाला.
२. ही लिलावप्रक्रिया दाऊदच्या नावाशी संबंधित असल्याने अनेक वेळा ही प्रक्रिया राबवूनही यश मिळाले नव्हते. वर्ष २०१७, २०२०, २०२४ आणि २०२५ मध्येही लिलावाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र खरेदीदारांनी दहशतीमुळे बोली लावण्यापासून माघार घेतली होती.
३. देहलीचे अधिवक्ता अजय श्रीवास्तव यांनीही काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या; मात्र कायदेशीर गुंतागुंतीमुळे प्रक्रिया रखडली होती.
४. दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर असलेल्या ४ मालमत्तांचा यात समावेश आहे. लिलावाच्या नियमांनुसार खरेदीदाराला एप्रिल २०२६ च्या प्रारंभी सर्व रक्कम जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच खरेदीदाराला भूमीचे नियंत्रण मिळू शकेल.
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !