
पणजी, १० मार्च (वार्ता.) – विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ मार्चला मिराबाग येथील बंधारा प्रकल्पाच्या विरोधात ४ आंदोलकांनी सभागृहाच्या प्रेक्षक दालनातून फलक दाखवून निषेध केला होता. या प्रकरणी गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहाची विनाअट क्षमा मागितली. आमदार सरदेसाई यांनी २४ घंट्यांच्या आत सभागृहाची क्षमा मागावी, असे निर्देश सभापती गणेश गावकर यांनी ९ मार्च या दिवशी सभागृहात दिले होते.
१० मार्च या दिवशी याविषयी विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘मला सभापतींविषयी पूर्ण आदर आहे. गेली १४ वर्षे मी सत्तेत आणि विरोधी बाकांवर बसून काम केले आहे. मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही उत्तरदायित्व सांभाळले आहे. त्यामुळे सभागृहाचे काम मला चांगले समजते. लोकप्रतिनिधी म्हणून गोमंतकियांचे प्रश्न मांडणे, हे माझे कर्तव्य आहे. नागरिकांना विधानसभेच्या प्रेक्षक दालनामध्ये उपस्थित रहाण्यासाठी प्रवेशपत्र देण्याचा आमदारांना अधिकार असतो. ६ मार्चला झालेली घटना योग्य नव्हती. आंदोलन करणार्यांच्या वर्तनाविषयी मला आधी कल्पना असती, तर त्यांना मी प्रवेशपत्र दिले नसते. ज्यांना प्रवेशपत्र दिले त्यांच्या वर्तनावर माझे नियंत्रण नाही. जर प्रवेशपत्र दिलेल्या व्यक्तींच्या वर्तनाचे उत्तरदायित्व आमदारांवर टाकायचे असेल, तर त्याविषयी सभागृहात चर्चा करून स्वतंत्र नियम किंवा कायदा करावा लागेल. मी आंदोलकांना प्रवृत्त केल्याचे चौकशीत समोर आलेले नाही.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात