
पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – जुने गोवे येथील वायंगणी, तिसवाडी येथील श्री देव गोवेश्वर महाशिव मंदिराच्या कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून १४ फेब्रुवारी या दिवशी ३०० कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. आजच्या या हिंदु धर्म पुनर्प्रवेश सोहळ्याला देशभरात अनेक आखाड्यांचे संतमहंत उपस्थित होते. वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांनी या वेळी धार्मिक विधी केले.

परकीय आणि परधर्मीय धर्मप्रचारकांनी भूलथापा देऊन, आमिषे दाखवून या कुटुंबांना त्यांचा धर्म स्वीकारणे भाग पाडले होते. आता त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप झाला होता.
🔱 Historic Gharwapsi in Old Goa! 🔱
On the eve of #Mahashivratri, 300 families returned to the Hindu fold Inspired by Jagadguru Ramanandacharya Narendracharyaji Maharaj (@_Jagadguru) during the sacred Kalasharohan & Pran Pratishtha ceremony at Shri Dev Goveshwar Mahashiv… pic.twitter.com/2KMPPbdTPP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 15, 2026
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी त्यांना विश्वास दिला. तेदेखील महाराजांच्या उद्धारक विचारांनी प्रेरित झाले. त्यांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. १४ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आजवर अशा वाट चुकलेल्या १ लाख ५३ सहस्र ६४३ बांधवांना वेळोवळी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश दिला आहे. त्यांचे हे महान धर्मकार्य अव्याहतपणे चालूच आहे. अनेकांनी त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे.
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !