Taloja Hindu Attack : भूमी बळकावण्यासाठी तळोजा येथील धर्मांधांकडून व्यंकटेश कोळी यांच्यावर दुसर्‍यांदा प्राणघातक आक्रमण !

  • हिंदुत्वनिष्ठ कोळी यांच्या पाठीशी

  • आरोपी कह्यात

व्यंकटेश कोळी या हिंदु युवकावर तळोजा येथील धर्मांध मुसलमानांचे प्राणघातक आक्रमण !

नवी मुंबई – खारघर भागातील पेठ येथील व्यंकटेश कोळी या हिंदु युवकावर तळोजा येथील मुसलमानांनी प्राणाघातक आक्रमण केले असून ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी माध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार खारघर येथील कोळ्यांच्या वस्तीची भूमी गिळंकृत करण्यासाठी गेले काही महिने तळोजा येथील मुसलमान प्रयत्न करत आहेत. ते तिथे गोवंशियांचे मांस आणून टाकतात. या त्रासाला कंटाळून तेथील सर्व कोळी बांधवांनी तेथील जागा सोडून दिली; मात्र व्यंकटेश कोळी यांचे कुटुंब तेथेच रहाते. यावरून तळोजा येथील मुसलमान काही ना काही कारणाने त्यांच्याशी वाद उकरून काढत होते. व्यंकटेश कोळी यांना मारण्याच्या धमक्या त्यांच्या आईला मुसलमानांनी यापूर्वी दिल्या आहेत. मागील महिन्यातही कोळी यांच्यावर मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले होते.

गेल्या वर्षीही व्यंकटेश कोळी यांच्या विरोधात मुसलमानांनी घातला होता वाद !

धर्मांधांच्या प्राणघातक आक्रमणात घायाळ झालेले व्यंकटेश कोळी !

व्यंकटेश कोळी यांच्या आईने सांगितल्यानुसार मागील रामनवमीलाही मुसलमानांनी व्यंकटेश याने मुसलमानांच्या विरोधात साक्ष दिल्यावरून काही वाद उकरून काढला होता आणि त्या संदर्भात पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या आईने मुसलमानांच्या विरोधात तब्बल १० तक्रारी केल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी मुसलमानांवर काहीच कारवाई केली नाही. (यापूर्वीच पोलिसांनी मुसलमानांवर कारवाई केली असती, तर आज मुसलमानांनी कदाचित् ही आक्रमणे केली नसती. लाचखोर पोलीस हिंदूंसाठी काहीच गांभीर्याने करत नाहीत आणि मुसलमानांच्या बाजूने रहातात, हेच यावरून सिद्ध झाले ! आपत्काळात असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधी तरी करतील काय ? – संपादक)

हे ही वाचा → संपादकीय : भूमी जिहाद्यांचा उच्छाद !

या घटनेत व्यंकटेश कोळी यांच्या टेम्पोसाठी भाडे असल्याचे मुसलमानांनी सांगितले आणि कोळी तळोजा येथे गेल्यावर २५ मुसलमानांनी तलवारी, चॉपर, दांडुके घेऊन त्यांच्यावर आक्रमण केल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी माध्यमांना सांगितले. गोरक्षकांवर आक्रमण करणारे सुटतात, तसे येथे आरोपी सुटायला नको, असा प्रयत्न पालिसांनी करावा, अशी मागणी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. (पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर हिंदूंना कुणी वालीच नाही, असे त्यांना वाटेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

या प्रकारामुळे खारघर येथे भूमी जिहाद किती गंभीर प्रकारे चालू आहे, हे उजेडात आले !